
समस्त सक्षमीकरण बहुउद्देशीय विकास संस्थेद्वारा सामाजिक न्याय दिवस
गडचिरोली: समस्त सक्षमीकरण बहुउद्देशीय विकास संस्थे तर्फे सामाजिक न्याय दिवस म्हणून राजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली व जयंतीचे औचित्य साधून यावर्षी वृक्षरोपण करून शाहू महाराज यांच्या स्मृतीस अर्पण करण्याचा संकल्प संस्थेतर्फे करण्यात आला. संस्थेचा असा मानस आहे की, ‘आभाळाएवढ्या विचारापेक्षा कणभर कृती श्रेष्ठ‘ या विचारांनी प्रेरीत होऊन समाज हितासाठी काळाची गरज असणाÚया विषयाला कृतीतून समाजापुढे एक आदर्श ठेवण्याकरिता हा उपक्रम करण्यात आलेला आहे व तो पुढील वर्षभर वेगवेगळ्या प्रकारे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.
मानवी जीवनाच्या हितार्थ आज निसर्गाला जतन करण्याची सर्वाना अतिशय आवश्यकता आहे. त्यात वृक्ष संवर्धन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, ज्यावर मानवाचे जीवन व भविष्य हे निसर्गातील घटकांवरती अवलंबून आहे. त्यात हवा पाणी शुद्ध व स्वच्छ वातावरण समाजाला निरोगी आयुष्यसाठी आवश्यकता आहे. त्या दृष्टीकोनातून आज बदलत्या हवामान चिंतेचा विषय बनलेला आहे. जर याच प्रकारे हवामान बदलामुळे पावसाचा अभाव उष्णतेची वाढ होत राहिली तर मानव समाज यात होरपळून निघणार, करिता समाज जागृती अत्यंत आवश्यक असून वृक्ष लावणे व त्याचे संवर्धन करणे हे आज प्रत्येक नागरिकांचे नैतिक कर्तव्य आहे. बालपणापासूनच आपण लहान मुलांमध्ये झाडांचे महत्व व झाडांबद्दल पे्रमभाव रुजवून त्यांच्यामध्ये निसर्गाप्रती जिव्हाळा निर्माण करू शकतो, तसेच त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी ही त्याला समजावून संस्कारातून देऊ शकतो. याच उदात्त विचाराने संस्थेने आज बालकांकडून वृक्षरोपण करवून घेण्याचा कार्यक्रम व वृक्षांचे महत्त्व तसेच त्याचे संवर्धन करण्याचे तंत्र बालपणात रुजवण्याचा एक प्रयोगात्मक प्रयत्न सदर उपक्रमक्रमाद्वारे केलेला आहे. त्यात बालकांनी विविध झाडांची बी रोपण करून त्याचं रोप झाल्यानंतर मोठ करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. अशा प्रकारे बालकांमध्ये वृक्षारोपण संस्कार आज संस्थेतर्फे घेण्यात आलेला आहे. हा उपक्रम विविध शाळा तसेच अन्य माध्यमातून संस्था पुढेही राबवणार आहे
.हा छोटासा एक प्रयोग करून छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिपित्यर्थ संस्थेच्यावतीने राजांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकत्र्या अॅड. भावना लाकडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे स्वयंसेवक कार्यकर्ते श्रेयस सयाम, प्रवीणा लाडवे, प्रेरणा उराडे, डिंपल चुणारकर यांनी चिमुकल्यांना वृक्षलागवड व त्यांची निगा राखण्याबाबत धडे दिले व मार्गदर्शन केले.