31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सीईओंना करावी लागली शिक्षकांची बदली रद्द

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सीईओंना करावी लागली शिक्षकांची बदली रद्द

0
10510

blank

जुनेच शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी चिमुकल्यांचा शाळेबाहेर ठिय्या

देवरी, दि.08 ; बऱ्याच वर्षापासून बंद पडलेली जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मागील  पाच वर्षापूर्वी सुरु करण्यात आली.6 मुलांपासून सुरु करण्यात आलेल्या शाळेत आज 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मात्र या शाळेला संचमान्यता देण्याचे काम जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग करु शकले नाही.उलट ज्या शिक्षकांमुळे ही शाळा पुन्हा नावलौकीक मिळवू लागली त्या ३  शिक्षक मंगलमुर्ती सयाम,वाघदेवे व चोपकर यांची बदली नियमावर बोट ठेवून केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांत प्रचंड असंतोष उफाळून आला.आणि आज ८ जुर्ले रोजी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी शाळेसमोरच जोपर्यंंत आमच्या शिक्षकांची बदली रद्द होत नाही,तोपर्यंत शाळेत जाणार नाही अशी भुमिका घेत आंदोलनाला सुरवात करीता जिल्हा परिषद प्रशासनविरोधात रोष व्यक्त केला.त्यातच बदली करण्यात आलेल्या शिक्षकांचे आदेश रद्द करा अन्यथा आमच्या पाल्यांची टि.सी.द्या ही भूमिका घेतल्याने अजूनच  गोंधळ वाढला.त्यामुळे गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांनी आंदोलक पालक व विद्यार्थांची बाजू समजून घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माहिती दिली.शेवटी विद्यार्थी एैकत नसल्याचे व स्थिती हातून जात असल्याचे समजताच मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानाथम एम यांनी देवरीची जिल्हा परिषद हायस्कुल गाठली.आणि बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश रद्द करीत १५ दिवसात शाळेला संच मान्यता मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकासंह विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे  घेतले.पाच वर्ष लोटूनही संच मान्यता मिळाली नाही यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही उपस्थितांसमोर खेद व्यक्त केले.

जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजे यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असतांना  ‘मांगेल त्या ठिकाणी’जिल्हा परिषद शाळेतील 626 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचे प्रशासन म्हणत असले तरी या बदली प्रकियेत अधिकारी यांनी आपण जे म्हणू तीच दिशा ठरवल्याने अनेक शिक्षकांवर अन्यायही झाल्याचे दिसून आले.त्यातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव येथील विद्यार्थी,पालकांनीही शिक्षकाकरीता शाळेला कुलूप ठोकल्याचे प्रकरण समोर आले होते.तर सहा वर्षापुर्वी बदली पोर्टलच्या चुकीमुळे जे शिक्षक विस्थापित झाले,त्यांना ज्या शाळा दिल्या तिथे त्यांनी काम केले.मात्र यावेळी बदलीच्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी त्यांची बाजू न एैकता बदल्यांचे धोरण राबविल्याने पुन्हा त्यांच्यावर त्याच शाळेत राहण्याचीही वेळ आली.

शैक्षणिक सत्र २०२३-२०२४ सुरू होऊन आठवडा लोटला आहे. त्यात शिक्षकांच्या झालेल्या बदल्यामुंळे अनेक शाळेत नविन शिक्षक रुजु झालेत. असाच प्रकार  देवरी शहरातील जिप हायस्कुलबाबत झाला. येथे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जे शिक्षक होते. त्यातील तिन शिक्षकांची बदली झाली. पंरतु विद्यार्थांनी आमचे शिक्षक आम्हाला परत करा,या मागणीला जोर धरत विद्यार्थांनी  शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला.तिन्ही शिक्षकांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत विद्यार्थीही शाळेत बसणार नसल्याची भूमिकाच विद्यार्थांनी घेत शिक्षकांची बदली करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी जोपर्यत येऊन आम्हाला आश्वासन देत नाहीत.तोपर्यंत शाळेबाहेर आमचे आंदोलन सुरूच राहणार,अशी भूमिका घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांशी मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानाथम एम यांनी शाळेत येऊन संवाद साधत त्यांच्या मागण्या मान्य करीत आंदोलन संपविले.विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत नवीन शिक्षक देणार व पुर्वीच्या शिक्षकांची बदली स्थगित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले.त्यानंतरही जर कधी शाळेतील माजी मुख्याध्यापक मंगलमूर्ती सयाम, वाघदेवे, चोपकर याना हटविण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा आंदोलन करु असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.

blank