30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक हरित सेनेने पर्यावरण संवर्धनाचे कार्य करावे- टी एच धमडेरे

हरित सेनेने पर्यावरण संवर्धनाचे कार्य करावे- टी एच धमडेरे

0
91

blank

“छत्रपती शिवाजी संकुल, देवरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.”

देवरी,दि.१९-“माणसाप्रमाणे सर्व प्राण्यांना या पृथ्वीतलावर जगण्याच्या अधिकार आहे.  समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या रुपाने कार्यरत हरीत सेनेने आपली जबाबदारी स्विकारुन पर्यावरण संवर्धनाचे कार्य करावे” असे प्रतिपादन गोंदिया येथील सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय व्यवस्थापक टी. एच. धमडेरे साहेब यांनी आज (दि.१९) रोजी देवरी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.

ते स्थानिक छत्रपती शिवाजी संकुल येेथे आज शुक्रवारी (१९) छत्रपती शिवाजी संकुल उत्सव समिती व राष्ट्रीय हरित सेनेच्या इको क्लबच्या वतीने आयोजित “वृक्षारोपणाचा” कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामसिंग येरणे हे होते.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंदिया येथील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय व्यवस्थापक टी. एच. धमडेरे हे उपस्थित होते. यावेळी देवरीचे  वनपरिक्षेत्राधिकारी ए. के. मडावी, देवरीचे गटविकास अधिकारी सिंगणजुडे,कृषि विस्तार अधिकारी बी. यू. हुड, शिक्षण संस्थेचे  सचिव अनिल येरणे, कोशाध्यक्ष जयश्री येरणे, सर्व विभागांचे प्राचार्य, आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी संकुलामध्ये शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व पथनाट्यामधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरालगत असलेल्या एमआयडीसी पोलाद कारखान्याच्या बाजुला असलेल्या रोडवर पिंपळ व विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  एम. जी. भुरे यांनी केले. सूत्रसंचलन एस. टी. मेश्राम आणि  एस. टी. भांडारकर यांनी केले. उपस्थितांचे आभार अश्मित पिल्लई यांनी केले.  यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank