महाराष्ट्र विज निवृत्त जेष्ठ नागरिक संघ भंडारा अध्यक्ष पदी हरीश डायरे यांची निवड

0
23

भंडारा,दि.२३ः महाराष्ट्र विज निवृत्त जेष्ठ नागरिक संघाची सभा भंडारा येथे प्रदेश अध्यक्ष जे.आर.घोंगडे व उपाध्यक्ष के.एच.बसंतवानी यांच्या उपस्थितीत भंडारा जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.त्यात भंडारा जिल्हा अध्यक्ष पदी हरीश डायरे यांची निवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी तुषार किरोलीकर,उपाध्यक्ष पदी मुंकूद पिथोडे,सचीव डी.एम.मोहबे,सहसचिव भोजराज गभणे,अरूण ठाकरे,एच.के.कटोते,व्ही.बी.मेश्राम,संघटक व्ही.सी.साखरे, आर.बी.लव्हात्रे,गाडीगोणे यांची निवड करण्यात आली.या सभेला रमेश पांडे, डी.एस.कुथे, आर.आर.महरवड,सुभाष सेलोकर,एच.डब्लु.डोरले,जी.बी.पारधी,खलील खान,ए.बी.कुरेशी,सुशील शिंदे,इलियास सिद्दीकी,शिवपालसिंह कछवाह,आर.आर.चाचीरे,पी.सी.कटकवार,केशव देखने,जी.पी.बिसेन, घनश्याम थोटे, बी.एच.खोब्रागडे, व्ही.एन.अवसरे,सी.एम.गोटाफोडे,पी.जे.देशकर,ऐ.यु.गेडाम व बहुसंख्येने सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन पटले यांनी केले.