पुरात अडकले असाल तर थेट मला संपर्क करा : माजी मंत्री राजकुमार बडोले

0
126
बडोलेंनी आपला मोबाईल क्रमांक सोशल मिडिया वर शेयर करत नागरिकांना केले आवाहन
अर्जुनी मोरगाव -विधानसभा क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूर आला, त्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले. सोबतच यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून गावांचे रूपांतर बेटांमध्ये झाले आहे. त्यामुळे आपण पुरात अडकले असाल आणि आपल्याला मदत लागत असेल तर आपण थेट माझा मोबाईल क्रमांक ९४२१८०३५१२ वर संपर्क करावा असे आवाहन राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. सोबतच राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा केली आणि क्षेत्रात एनडीआरएफ च्या टीम तैनात करण्यासाठी विनंती केली.