हिरडामाली येथे आरोग्य निदान शिबीर,698 लोकांची तपासणी

0
36

गोरेगाव,दि.०५- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी अंतर्गत हिरडामाली येथे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आरोग्य निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.शिबीरादरम्यान गावातील 698 लोकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी माहीती दिली आहे.शिबीरा दरम्यान मधुमेह,रक्तदाब,हिवताप,क्षयरोग,सिकलसेल ई.विविध आजाराबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सोबत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील मुलांचे सिकलसेल तपासणी करण्यात आली. शासकिय वैद्यकीय महाविद्यालय तपासणी चमुमध्ये डॉ.आंभिलकर,डॉ.मेश्राम,डॉ.डोंगरे व डॉ.अनंत चांदेकर यांचेसह एम.बी.बी.एस.प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.आशिष मेश्राम,डॉ.सोनल बिसेन,डॉ.पामेंद्र तुरकर,डॉ.संजय रहांगडाले,डॉ.मनिष कटरे सोबत आरोग्य सेविका मंजुटे ,घासले व बोरकर तर आरोग्य सेवक हरिणखेडे व नागपुरे यांनी आरोग्य सेवा दिली.यावेळी गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण व प्राथमिक आरोग्य केंद्र सोनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कुलदीप बघेले सुद्धा उपस्थित होते.यावेळी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय चमुमार्फत अवयवदानाबाबत कलापथकाच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.