सुप्रिया सुळे यांचा फोन,व्हॉट्सअ‍ॅप हॅक…

0
145
पुणे,दि.११– व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत असतात. अनेक मोठे सरकारी अधिकारी व राजकीय व्यक्तींचे फोन हॅक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.अशी अनेक उदाहरणे जनतेसमोर आली आहेत.आता राष्ट्रवादीच्या  खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याचे उघडकीस आले आहे.

 
    सुप्रिया सुळे यांनी स्वतःच एक्स या सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. “माझा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाला आहे. कोणीही मला मेसेज करू नये. या बाबत मी पोलीसांत तक्रार करीत आहे. कृपया याची नोंद घ्यावी”, असे सुळे यांनी नमूद केले आहे.राजकारणातील बडे प्रस्थ असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदाराचा फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.