सत्यशोधक समाजाचा १५१ स्थापना दिन टेमणीत उत्साहात साजरा

0
242
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 37;

गोंदिया,दि.२३ः-महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील जातीभेद विरोधात सर्वप्रथम आवाज उठवला. पण केवळ या प्रथांना विरोध करणे पुरेसे नाही तर त्याविरोधात जनजागृती होणे गरजेचे आहे, त्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी धार्मिक मक्तेदारी, एकाधिकारशाही, अनिष्ट प्रथा-परंपरा, चालीरीती,धार्मिक पाखंड, वर्ग आणि वर्णव्यवस्था याविरोधात आवाज उठवला असे विचार सामाजिक कार्यकर्त्या डाॅ.प्रा.सविता बेदरकर यांनी व्यक्त केले.त्या आज तालुक्यातील टेमणी येथे ओबीसी अधिकार मंच,फुले शाहू बिरसा आंबेडकर विचारमंच व इतर बहुजन संघटनाच्यावतीने आयोजित सत्यशोधक समाज १५१ व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होत्या.
यासर्वत्रासातून समाजाला मुक्त करण्यासाठी महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची
स्थापना केली होती. सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे धार्मिक सुधारणांचा पाया आणि मानव मुक्तीचे पहिले
पाऊल होते असे मत प्रा.सविता बेदरकर यांनी व्यक्त केले आहे.यावेळी ओबीसी अधिकार मंचचे मुख्य संयोजक खेमेंद्र कटरे,ओबीसी चळवळीतील जेष्ठ पदाधिकारी रमेश ब्राम्हणकर,कैलास भेलावे,शालीकराम भेलावे,माळी समाज अध्यक्ष संदिप बानेवार,फुले-शाहू-बिरसा-आंबेडकर संघटनेचे नरेश परिहार,इर्रीचे उपसरपंच भाऊलाल तराेणे,सेवा सहकारी संस्थेचे सदस्य शरद लांजेवार,ओमप्रकाश पटले,माजी ग्रा.प.सदस्य योगेश गायधने,ग्रा.प.सदस्य शेखर किरणापूरे,भरत बानेवार,अरुण बानेवार,देवराम गायधने,कमलाकर तयकर,कोळसिंग बिसेंन,माधोराव आंबेडारे,हनसराम मलगाम,श्री.पळसमोळे आदी  उपस्थित होते.