बीजेपी ‘या’ नेत्याच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवणार

0
181

गोंदिया,दि.२४ः- भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुका आपल्यासाठी एक नवीन परीक्षा असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करायला हवं असं म्हणतं त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वव्यापी नेतृत्व आपल्याकडे आहेच, तसेच अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने निवडणुका लढवायच्या आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे. लवकरच निवडणुका आयोग महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार अशी शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही गटांमध्ये सध्या जागा वाटपावर जोरदार खलबत सुरू आहे.

अशातच मात्र भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राज्यातील विधानसभा निवडणूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात लढवणार अशा चर्चांना उधाण आले आहे.