कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करा,प्रधानसचिवांना जि.प.अध्यक्षांचे पत्र

0
1576

गोंदिया- ग्रामीण भागातील ग्रामविकासाची कामे ही जिल्हा परिषदेतंर्गत होत असल्याने राज्यसरकारच्या विविध विभागांशी संवाद होऊन राज्यस्तर विभागाची माहिती जिल्हा परिषदेला प्राप्त व्हावी याकरीता सर्वसाधारण सभेसह स्थायी समितीच्या सभेला अधिकार्यांना आमंत्रित केले जाते.मात्रे गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक बांधकाम विभाग क्रं.१(रोहयो) व सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.२ च्या कार्यकारी अभियंत्यानी जिल्हा परिषदेच्या या दोन्ही सभांना दांडी मारत आपले प्रतिनिधी न पाठविल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे या आशयाचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी राज्याच्या प्रधानसचिवांना व बांधकाम विभागाच्या सचिवांना पाठविले आहे.

अध्यक्ष रहागंडाले यांनी पाठवलेल्य पत्रात अनेकदा संबधित कार्यकारी अभियंत्याना सभेचे पत्र दिल्यानंतरही गैरहजर राहिल्याने रस्ता बांधकामातील अनेक समस्या सोडविण्यात अडचणी निर्माण झाल्याचे म्हटले आहे.यांच्यामुळे ग्रामीण भागातील रस्तेविकासही थांबल्याने मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभेला सतत गैरहजर राहणार्या या अधिकार्याची विभागीय चौकशी करण्याचीही मागणी केली असून सरकार अध्यक्षांच्या या पत्राकडे किती गांभीर्याने लक्ष देते याकडे लक्ष लागले आहे.