भंडारा,दि.३० :- भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल यांच्याशी राजकीय पक्षाशी चर्चा करण्याकरिता विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन केले होते.यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष यांनी पक्षाचे वतीने वर्षभरात भंडारा जिल्ह्यातील विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. यात अनेक तक्रारी करून देखील जिल्हा प्रशासन ही साधी दखल देखील घेत नसल्याची तक्रार राज्यपाल यांच्याकडे केली.कलेक्टर कार्यालय येथे सामान्य नागरिकांना भेट घेण्यासाठी दोन तास वाट बघावी लागतेय यावर हेल्पडेक्स सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली.विविध विषयांवर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदन यावर काय काय कार्यवाही करण्यात येते,त्यावर निवेदन देण्याऱ्या ना रीतसर माहिती देण्यात यावी.घरकुल बांधकाम मधील पट्ट्या ची अटी रद्द करण्यात याव्या,अशा विविध मागणी अजय मेश्राम यांनी केली आहेत.राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी अजय मेश्राम, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय नासरे, महासचिव दिलीप सोनूले, शहरध्यक्ष मधुकर चौधरी, हे प्रामुख्याने उपस्थित होते.