भारतीय संस्कृतीत जेष्ठ नागरिकांना आदराचे स्थान – माजी आमदार राजेंद्र जैन

0
56

गोंदिया,दि.०२ः-भारतीय संस्कृतीमध्ये जेष्ठ नागरिकांना आदराचे स्थान आहे. त्यांच्या हिताची व सन्मानाची काळजी घेणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. भविष्यात ज्येष्ठांचे अनुभव व मार्गदर्शन नेहमी आम्हाला लाभत राहील, या दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर व्यक्त करुन माजी आमदार  राजेंद्र जैन यांनी ज्येष्ठ नागरिकांना पुढील आयुष्याच्या व निरोगी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

आज गोंदिया स्थित बापट लॉन, कन्हारटोली येथे जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त, गोंदिया जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ गोंदियाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन माजी आमदार  राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या धावपळीच्या आयुष्यात त्यांना आनंददायी व उत्साही जिवन जगण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, डी यु रहांगडाले, माधुरी नासरे, दुलिचंद बुद्धे, ऍड लखनसिह कटरे, नारायण प्रसाद जमईवार, संजय कटरे, अनुप शुक्ला, दिलीप देशमुख , शरद क्षत्रिय, मोहन कोतवाल, यांच्या सह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.