* 22 गावांत 5 कोटीच्यावरुन विकास कामांचे भुमीपुजन
अर्जुनी/मोर.:- माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रांतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते ता.7 रोजी संपन्न झाले.
विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी आपन तत्पर आहोत. गावाचा विकास झाला तर विधानसभेचा विकास होईल. त्या साठी क्षेत्र निहाय विकास आवश्यक आहे.त्यामुळे विकासापासून कोनतेही गाव वंचित राहू नये या साठी सदैव प्रयत्नशील राहू असे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
अर्जुनी मोर.विधानसभा क्षेत्रांतर्गत अर्जुनी मोर तालुक्यातील 22 गावात 5 कोटीच्या वरुन विकासकामांचे भुमीपुजन प्रसंगी माजी मंत्री बडोले बोलत होते.
या वेळी नवनितपुर,शिरोली, महागाव,बोरी, मांडोखल ,कोरंभी ,अरुण नगर ,कोरंभिटोला, गौरनगर, जाणवा,येगाव, खामखुरा, इटखेडा, वडेगाव , कान्हाळगाव, बुधेवाडा, झरपडा, धाबेटेकडी,तिडका, बोलदे,देवळगाव या गावात विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी जि.प.सदस्या पोर्णिमा ढेंगे, जि.प.सदस्या जयश्री देशमुख, माजी जि.प.सदस्य रामदास कोहाडकर, माजी सभापती उमाकांत ढेंगे, अनिल देशमुख, देशमुख सर,जेष्ठ भाजपा कार्यकर्ते मुरलिधर ठाकरे,कृऊबा संचालक प्रदिप मस्के,उपसभापती होमराज पुस्तोळे, पं.स.सदस्य डाॅ. नाजुक कुंभरे, नुतनलाल सोनवाने, प्रमोद लांडगे, तथा नितीन नाकाडे, ईश्वर खोब्रागडे, गोपी लंजे,अरविंद जांभुळकर, सरपंच गणीकाताई नाकाडे, सरपंच बन्सीधर लंजे,सरपंच किशोर ब्राम्हणकर, होमदास ब्राम्हणकर, तथा भाजप पदाधिकारी, सर्व गावातील सरपंच, ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.