महसूल विभागाच्या सहकार्याने नवेगाव(धा.) परिसरात अवैध गौणखनिजाचे उत्खनन

0
334
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;

अवैध उत्खननाती मुरूमाचा राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात होतोय वापर

गोंदिया,दि.१०ः-ःतालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील अन्य भागात सुध्दा गौणखनिज उत्खननावर वाळू, दगड, मुरूमाचा बेकायदा उपसा आणि चोरटी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.गेल्या अनेक महिन्यापासून धापेवाडा ते गोंदिया व दतोरा-खमारी मार्गावर दरदिवसाला मुरुम घेऊन जाणार्या ट्रकची संख्या मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे.

सकाळपासून सायकांळपर्यंत मुरूम वाहतूकीचा अधिकृत परवाना नसतानाही वाहन जात असताना त्यावर कारवाई मात्र केली जात नाही.त्यामुळे तालुक्यातील गौणखनिजाचा मोठा महसूल या चोरटी वाहतूक व उत्खननातून बुडत आहे.तालुक्यातील नवेगाव परिसरातून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेला गौणखनिज माफिया अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन करीत असल्याचे चित्र असून त्या अवैध उत्खननातील मुरूम हा गोंदियात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात व सुभाष गार्डनमधील कामात वापरला जात असल्याचेही बघावयास मिळाले.सकाळपासून रात्रीपर्यंत अवैधरित्या खुलेआम मुरूमाचे अवैध उत्खनन होत असतांना सर्वसामान्य जनतेला अवैध गौणखनिजाची वाहतूक होतांना दिसते,मात्र महसूल विभागातील तलाठी,मंंडळ अधिकारी व तहसिलदारांनाच का दिसत नाही,अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

 पोलीस विभागाच्यावतीने अवैध गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करण्यात आली,मात्र महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून कारवाई करण्यात आल्याचे कुठेच दिसून येत नाही.