पिंपळगाव येथे बुध्द मुर्तीचे अनावरण व आरोग्य शिबीर 14 ऑक्टोबर रोजी

0
52

अर्जुनी मोर.-68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन तालुक्यातील पिंपळगाव/खांबी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमीत्त 14 ऑक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्ध मुर्तीचे अनावरण व मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सारिपुत्त बुध्द विहार पिंपळगाव/खांबी येथे माजी मंत्री राजकुमार बडोले फाऊंडेशन तर्फे दान देण्यात आलेल्या बुध्द मुर्तीचे अनावरण 14 ऑक्टोबर ला दुपारी 12 वाजता पुज्य भंते नागसेन नागपुर यांचे हस्ते माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधुन सकाळी नऊ वाजता गंगाबाई मेमोरियल मल्टीस्पेशियालीटी हाॅस्पीटल अर्जुनी मोर. च्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता बुध्द मुर्ती स्थापना आणी परित्रण पाठ होईल.सांयकाळी धम्मभोजनानंतर रात्रौ 8 वाजता अविकुमार प्रस्तुत भिमबुध्द गितांचा कार्यक्रम होणार आहे. या धम्म कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सारिपुत्त बौध्द समाज पिंपळगाव च्या वतीने करण्यात आले आहे.