
मुंबई,दि.१२ः:-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बांद्रा ईस्टमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांना लीलावती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होते.मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या बांद्रा पूर्वेत खैरनगर परिसरात ही घटना घडली असून बाबा सिद्दिकी यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे.
राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना आज मुबंंईत घडली.बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले आहे.बाबा सिध्दीकी यांच्या हत्येनंतर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी काँग्रेस पक्षात असताना सहकारी म्हणून आम्ही पक्षासाठी सोबत काम केले आहे. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,असे ट्विट करीत राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे. गुन्हेगारांना सरकार वाचवते, एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो ही गंभीर बाब आहे याची चौकशी झाली पाहिजे,असे म्हटले आहे.