
अर्जुनी/मोरगाव : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी पोलीस स्टेशन हद्दीत दि.17 ऑक्टोबर 2024 रोजी गुरुवार ला काही इसम बेकायदेशीररित्या गोवंश जनावराचे मांस विक्री करण्याच्या उद्देश्याने गोवंश जनावरांचा मांस जवळ बाळगुन असल्याची गोपनीय माहिती केशोरी पोलीसांना मिळाली असता गोपनीय माहितीवरुन वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केशोरी पोलीसांनी कसलाही विलंब न करता मौजा तुकुमनारायण येथे जावुन जितेंद्र राऊत यांचे राहते घरी छापा टाकला असता त्याचे घरी गोवंश जनावराचे अंदाजे 40 किलो मांस 6 हजार रुपये किंमतीचा माल मिळुन आला त्यावरुन जितेंद्र राऊत यांचेसह केशोरी येथील आत्माराम चवरे आणि सतीश वासनिक यांचेविरुद्ध विविध कलमान्वये केशोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्रवाई पोलीस अधिक्षक गोरख भामरे,अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा,देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील,केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे,पोहवा होळी,राऊत, निकोडे, मपोना.सुखदेवे, पोशि.युवकांत भेंडारकर,नितिन डुंबरे,वाहन चालक अन्वर,पुस्तोडे यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश आंधे हे करीत आहेत.