34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांचा राकॉंमध्ये प्रवेश

माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांचा राकॉंमध्ये प्रवेश

0
4189

blank

गोंदिया- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि.राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते.मात्र महायुतीच्या फार्मुल्यात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्याने व अपक्ष निवडणूक लढवितांना होणार्या अडचणी लक्षात घेत आज मंगळवारला इंजि.राजकुमार बडोले यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितित  प्रवेश केला.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.बडोले यांच्या पक्ष प्रवेशानंतर विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे हे काय निर्णय घेतात याकडेही लक्ष लागले आहे.तर भाजपच्या गटात सुध्दा खळबळ उडाली आहे.

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले राजकुमार बडोले यांचा गोंदिया जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील बहुजन समाजात मोठा प्रभाव आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या महत्त्वाच्या भागात पक्षाची स्थिती मजबूत होणार आहे.
माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी २००९ मध्ये ६९८५६ मते घेत काँग्रेसच्या रामलाल राऊत यांचा १६३०७ मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये मतांची टक्केवारी कमी झाली. मात्र प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार राजेश नंदागवळी यांचा ३०२९५ इतक्या भरघोस मतांनी पराभव केला.अन राज्याच्या सामाजिक न्याय मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली.मात्र निवडणुकीच्या शेवटच्या सहा महिन्यापुर्वी भाजपने त्यांचे पालकमंत्रीपद काढून डॉ.परिणय फुके यांना दिल्याने बहुजन समाजात नाराजी निर्माण झाली होती.ती सावरत त्यांनी पक्षाचे काम सुरुच ठेवले होते.
त्यांच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्लंड येथील घर घेण्यात बडोले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.तसेच पहिल्यांदा सामाजिक न्याय विभाग गावखेड्यापर्यंत पोचला होता.मात्र, २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्वावादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडून राजकुमार बडोले यांना केवळ ७१८ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.त्यानंतरही मतदारसंघात मतदारसोबतचा संपर्क कायम‘ ठेवला होता.पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास रिंगणात उतरण्याची पुर्ण तयारीही केली होती.मात्र ही जागा महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी पक्षाच जाण्याचा निर्णय घेतला.तर दुसरीकडे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या प्रती प्रफुल पटेल यांच्या मनात नाराजी असल्याने त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित नव्हते हे हेरूनच बडोलेंनी प्रवेश केला आहे.

blank