25.8 C
Gondiā
Tuesday, September 1, 2026
Home राजकीय पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री इंद्रनील नाईक यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

0
18

गोंदिया, दि.1 : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक हे दि.2 सप्टेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9 वाजता लोणारा, नागपूर येथून मोटारीने गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता गोंदिया येथे आगमन व स्व. सुखदेव अग्रवाल (स्वतंत्रता संग्राम सेनानी – माजी आमदार) यांच्या 125 व्या जयंती महोत्सवानिमित्त श्री गुरुनानक स्कुल ग्राऊंड, गोंदिया येथे आयोजित मुख्य जयंती समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वाजता खासदार प्रफुल पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट. तदनंतर सोईनुसार गोंदिया येथून मोटारीने पुसद, जि.यवतमाळकडे प्रयाण करतील.