वाहन तपासणी दरम्यान तब्बल 1.5 कोटी रोकड जप्त

0
74

हिंगोली २५ ऑक्टोंबर: विधानसभा निवडणुक आदर्श आचार संहितेमुळे वाहनाची तपासणी केली जात आहे. त्यानिमित्त शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत वाहन तपासणी दरम्यान दोन वाहनातील १ कोटी ४० लाखांची रोकड ताब्यात घेतली. जिल्ह्यात ही पहिली कारवाई मानली जाते.

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत हे विधानसभा मतदार संघ आहे. निवडणुक निमित्ताने आदर्श आचार संहिता लागु केली असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या आहेत. त्यानिमित्ताने पोलीस प्रशासनाकडुन प्रत्येक दिवशी वाहन तपासणी केली जात आहे. यासाठी वेगवेगळे पथके नियुक्त केले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे वाहनातुन रोकड नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच २५ ऑक्टोंबर रोजी पथकाने हिंगोली बसस्थानक परिसरात वाहन तपासणी केली. ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या वाहनात मोठी रक्कम दिसुन आली. ही रक्कम मोजमाप केली जात असून जवळपास १ कोटी ४० लाख ३७ हजार ५०० रुपयांची रक्कम असल्याचे सुत्रांनी सांगितले. सदर रक्कम कोणाची व कुठे नेली जात असून या रक्मेचा राजकीय उमेदवाराशी काही संबंध आहे का या बाबतची माहिती पोलीस घेत आहेत.वाहनातुन मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्याची माहिती हिंगोली शहरात मिळताच एकच खळबळ उडाली आहे.