
बारामती-विधानसभा निवडणुकीत अवघ्या राज्याचं लक्ष हे बारामती विधानसभा मतदार संघाकडे लागलं आहे. कारण बारामती विधानसभा मतदारसंघात अजित परर विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ प्रचंड चर्चेत राहणार आहे. अशातच आज महाविकास आघडूकडून युगेंद्र पवार यांनी उमेदवार अर्ज भरला आहे. यावर शरद पवार यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीकडून युगेंद्र पवार यांनी आज बारामती तहसील कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते, कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित होते. याशिवाय युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुप्रिया सुळे आणि शरद पवार दे दोघेही बारामती कार्यालयात स्वतः हजर राहिले होते.
यावेळी युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शरद पवार यांनी ५७ वर्षांपूर्वीची आठवणही शेअर केली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा मी आढावा हा कित्येक दिवसांपासून घेत आहे. लोकसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्याची नोंद मी अंतकरणात कायम ठेवली आहे.
याशिवाय महाराष्ट्राच्या जनतेला मी विश्वास देतो की, महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात जनतेच्या हिताची जपणूक करणारा, तसेच महत्त्वाचे प्रश्न बेरोजगारी, शेतकरी, कामगार, महागाई, दलित आदिवासी महिलांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आमची आघाडी कायम करेल असा विश्वास मी देतो. याशिवाय निवडणुकीचा फॉर्म भरण्याकरता आपण सर्वजण याठिकाणी आलो आहोत. त्यामुळे मविआच्या वतीने युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र माझी खात्री आहे की बारामतीची जनता नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाला स्वीकारून मोठी शक्ती उभी करतील असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
“मी 57 वर्षांपूर्वी बारामतीच्या तहसील कार्यालयात माझा फॉर्म भरायला आलो होतो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने जनतेने मला निवडून देखील दिलं आहे. त्यामुळे 57 वर्षे एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी बनण्याची संधी दिली, त्याचं कारण जनतेशी असलेली बांधिलकी ही आहे. त्यामुळे आता नव्या पिढीच्या सर्वच उमेदवारांना माझा सल्ला आहे की जनतेशी बांधिलकी ठेवा असं शरद पवार म्हणाले आहे.