25.4 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home राजकीय राजकुमार बडोले यांनी मतदारांशी साधला संवाद

राजकुमार बडोले यांनी मतदारांशी साधला संवाद

0
110

सडक अर्जुनी, दि. 09 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावात जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे. 2009 पासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा प्रतिनिधित्व राजकुमार बडोले हे करीत असून आमदार असताना सामाजिक न्याय मंत्री राज्य पातळीवर अनेक विकास कामे केली तर माजी आमदार असताना सुद्धा मतदारांनशी नाळ जोडत त्यांच्या समस्या सोडवित असल्याने महायुतीतील राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाने राजकुमार बडोले यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे.निवडणूक प्रचार निमित्त क्षेत्रातील ग्राम तीरखुरी, बोलटोला, भरनोली, बल्लीटोला, खडकी, राजोली, तूकुमनारायण, कन्नडगाव, इळदा, जुनेवाणी, धमदीटोला, अरततोंडी या गावांमध्ये छोट्या सभेच्या माध्यमातून मतदार बंधूंना आपला उमेदवार लढत असून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

तर राजकुमार बडोले यांनी गेल्या 15 वर्षात राजकारण करीत असताना केलेल्या कामामुळे त्यांची ओळख फक्त जिल्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात पसरली आहे. त्यामुळे येत्या 20 ऑक्टोबर ला होऊ घतलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आव्हाहन राजकुमार बडोले मतदारांना करीत आहेत.