33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार;मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार;मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

0
34

blank

मुंबई:-राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सध्या सुरू असलेले राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहेत. अशात आज विधान परिषदेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील विविध विषयांवरही चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज विधानपरिषदेचे सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

आमदार नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत एक्सवरही पोस्ट करत माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करत म्हटले की, विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात, कारण संबंधित पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील. त्यानुसार, सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे.

blank