व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

0
85

देवरी, दि.१२ः राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया द्वारा आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ चा तालुकास्तरीय बक्षीस वितरण समारंभ गट साधन केंद्र पंचायत समिती देवरी येथे काल शुक्रवारी (दि.११) पार पडला. यामध्ये एकूण ३० शिक्षकांना बक्षीस म्हणून प्रविण्यानुसार एकूण चार गटात  विषयनिहाय रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमााच्या अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवरीचे गटविकास अधिकारी जी टी शिंगणजुळे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे,शिक्षण विस्तार अधिकारी एच जी राऊत , डोंगरगावचे केंद्रप्रमुख लाडेआदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक मुनेश्वर टेंभूर्णे यांनी केले. उपस्थितांचे आभार गटसमन्वयक धनवंत कावळे यांनी मानले. या कार्यक्रमाला  केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, तालुका समन्वयक IED, विशेष शिक्षक, सहाय्यक शिक्षक यांचे सहकार्य लाभले.