चित्रा कापसे/तिरोडा--मंगळवारी जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या आतंकी हल्ल्यात निर्दोष, आणि निष्पाप हिंदूचे जीव घेण्यात आले, अतिरेक्यांनी धर्म विचारून जीव घेतले.
या क्रूर घटनेचा निषेध म्हणून अंतरराष्ट्रीय हिन्दू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि सकल हिन्दू समाज तिरोडा यांच्या वतीने आज तिरोडा बंदचे आह्वान केले होते, ज्याचे प्रत्यक्ष प्रतिसाद बाजारपेठेत सकाळ पासूनच दिसत होते, शहरातील जुनी नगर परिषद कार्यालयासमोर अंतर्राष्ट्रीय हिन्दू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष रितेश तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत मारल्या गेलेल्या 28 हिन्दू बांधवाना श्रद्धांजलि वाहण्यात आली,देश हा हिंदूंचा असून, हिंदुस्तान या देशाचे नाव असून सुद्धा या देशात हिंदूच सुरक्षित नाही, हे हिंदूचे दुर्भाग्य नाही तर काय?हिन्दू एकता ही काळाची गरज आहे, सध्या हिन्दू राजकिय पातळीवर, जातीय पातळीवर विभाजित आहे, आपले आपसातील मतभेद विसरून एकत्र येऊनच हा हिन्दू समाज सुरक्षित राहू शकतो असा सुर सभेत उपस्थित अन्य मान्यवरांनी बोलले यामध्ये रमण सिंघल, मुन्ना भाऊ लिल्हारे, सुशील असाटी, दिलीप असाटी, मुकेश असाटी, संदीप तिवारी, अजय चावला धर्मेंद्र बोपचे,विक्रम डोळस,डाॅ हितेश मंत्री डाॅ निकेश मिश्रा , शितल तिवडे, अशोकजी असाटी , रामकृष्णजी शेंडे , विनोदजी मोहबे, संतोष चौधरी,पिंटु भगत, रामकृष्ण आगाशे या सर्वानीं आपले विचार मांडुन मृतकांना श्रद्धांजली वाहिली ,संपुर्ण देशात हिंदुनांच टारगेट केले जात आहे,झालेल्या दहशतवादी हल्यात पाकिस्तानचेच हात असुन ,सरळ शत्रुच्या घरात घुसुन मारण्याची वेळ ती हिच आहे ,शत्रुचा जो पर्यतं आपण बंदोबस्त करणार नाही ,तो पर्यंत हा सकल हिंदु समाज शांत बसणार नाही ,नंतर सभेत मृतकांना श्रद्धांजली वाहुन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरुन जे जे दुकाने शुरु होती त्यानां बंद करवुन तहसिल कार्यालय तिरोडा येथे तहसीलदारां मार्फत महामहीम राष्ट्रपती श्रीमती दौॅपदी मुर्मु यानां पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदन देन्यात आले ,
शिष्टमंडळात सारंग मानकर,निखील बैस, विनोद असाटी , विनोद हिरापुरे,प्रणय भांडारकर ,रमेश चौहान,गणेश ईठोले, गज्जु वाकडोत , कुणाल चौहान ,पं नंदकिशोर मिश्रा,हिमांशु यादव डिलेशजी पारधी नरेश बेलानी,धनराजजी छत्तानी,राजु मंत्री, शंकर देशमुख , प्रकाश ग्यानचंदानी,शैलेश देहलीवाल ,रोहित नागरीकर,ऊपस्थित होते