गोंदिया दि.०१ : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय निवड समितीने नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून उल्लेखनीय कार्यासाठी एका आदर्श तलाठ्याची निवड केली होती.त्यामध्ये गोंदिया तहसिल अंतर्गत येत असलेल्या कटंगीकला साझाचे तलाठी बिहारीलाल बिसेन यांची आदर्श तलाठी म्हणून निवड झाली होती.तलाठी बिसेन यांना आज 1 मे, महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त कारंजा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर,पोलीस अधिक्षक गोरख भामरे,जि.प.सीईओ एम.मुरगुनाथम,माजी आमदार राजेंद्र जैन,निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे,उपविभागीय अधिकारी खंडाईत,तहसिलदार श्रीकांत कांबळे,तहसिलदार समशेर पठाण आदी उपस्थित होते.तलाठी बिसेन यांना आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच तलाठी मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.