गोरेगाव, १ मे – पी. डी. राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तिपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख ध्वजारोहण गटशिक्षणाधिकारी एम डी पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत शिक्षण विस्तार अधिकारी डी टी कावळे,शाळेचे मुख्याध्यापक सी डी मोरघडे,पर्यवेक्षक ए.एच. कटरे ,भाष्कर डोंगरे,मनोज सुर्यवंशी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सळसळत्या स्वागतगीताने झाली. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगाण,महाराष्ट्र गीत व प्रतिज्ञा घेतली गेली. गटशिक्षणाधिकारी एम डी पारधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत महाराष्ट्राच्या स्थापनेचा इतिहास, मराठी अस्मिता व भाषेचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा अभियान ची सांगता ‘झाडे जगवा झाडे वाचवा’ वर सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘जय महाराष्ट्र’, ‘शिवगर्जना’ अशा नाट्यछटांद्वारे इतिहास जिवंत केला. शेवटी गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले.यावेळी आर.टी.पटले,वाय.के.चौधरी,आर.वाय.कटरे,जी.डब्ल्यू.राहांगडाले,एस. आर.राहांगडाले,डी.एम.राठोड, एस.एम.नंदेश्वर,ए.जे.सोरले,एम.डी.राहांगडाले,एस.आर.मांढरे,एस.जी.दमाहे,जे.वाय. बिसेन, झेड.सी.राऊत, झेड. जे. भोयर, बी. बी. राहांगडाले,अभय राहांगडाले,सत्यशिला येळणे,व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डी.बी.चाटे व ए.एस.बावनथडे यांनी तर आभार प्रदर्शन सी.आर.बिसेन यांनी केले.