· १०० दिवसांतील विकास कामांचा आढावा
सिंधुदुर्गनगरी, दि.०२: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले. त्यांनी या १०० दिवसांत जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयावर जिल्हा माहिती कार्यालयाने बनविलेल्या ध्वनिचित्रफितीचे (Video) प्रकाशन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवन येथील कार्यक्रमात पार पडले. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे १८ जानेवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. गेल्या १०० दिवसांत जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयावर या ध्वनिचित्रफितीव्दारे आढावा घेण्यात आला आहे.