त्या राईस मिलर्सकडून खंडणी मागणारे ते पत्रकार कोण ?

0
48

गोंदिया: सीएमआर त्या तांदुळ पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला यात तुमचा सहभाग आहे,अशी धमकीवजा माहिती देत राईस मिलर्सच्या कर्मचाऱ्यांकडून काही पत्रकारांनी खंडणी मागितल्याचा आरोप राईस मिलर्स व व्यापारी वर्गाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हेतर राईस मिलर्सच्या महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक करण्यात आली. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच असंतोष निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणाची तक्रार व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे खंडणी मागणारे ते पत्रकार कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिस विभाग या प्रकरणाची दखल घेवून त्या पत्रकारांना शोधन काढणार का? याकडेही लक्ष लागले आहे.
आधारभूत किंमतीमध्ये खरेदी केलेला धान राईस मिलर्सना भरडाईसाठी दिला जातो. त्या मोबदल्यात मिलर्स शासनाला सीएमआर तांदूळ पुरवठा करतात. मात्र काही मिलर्सकडून शासनाने ठरवून निकषान्वये सीएमआर तांदूळ पुरवठा करण्यात आला नाही. सीएमआर तांदूळामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच काही पत्रकारांनी या संधीचा लाभ घेत आमगाव येथील दोन राईस मिलर्सचे कार्यालय गाठले.
आज (ता. ९) दरम्यान तीन पत्रकार राईस मिलर्सच्या कार्यालयात पोचले व सीएमआर तांदळाचा मोठा घोटाळा आहे? अशी चौकशी केली. दरम्यान कार्यालयात बसलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक करीत पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर घोटाळ्याचे वृत्त प्रकाशित करू, असा धमकीवजा इशारा दिला. या प्रकारामुळे आमगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे. या प्रकाराची जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. खंडणी मागणारे ते पत्रकार कोण? असा शोध व्यापारी घेवू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिस विभागाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.