जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर पोहचले नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात

0
55

गोंदिया-जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी १० मे रोजी रात्रीला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देत पाहणी केली.नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत देत असलेल्या आरोग्य सेवाची पाहणी करुन जनसामान्य,गोरगरीब,शेतमजुर व मोलमजुरी करणार्या नागरिकांना गुणवत्तापुर्वक सेवा देण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकारी व कार्यरत कर्मचार्यांना दिले.आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांचे मोबाईल क्रमांक याची नोंद ठेवुन फालोअप ठेवण्याचे सुचित केले.ह्या वेळेस वैद्यकीय अधिकारी डॉ.अजिंक्य आंबेडारे,आरोग्य सेवक नेपाल नारनवरे,स्टाफ नर्स कल्याणी मंडरेले,परिचर हशीला वैद्य उपस्थित होते.जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील जंगलव्याप्त,अतिदुर्गम तालुक्यातील नागरिकांनी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रात लोकांनी प्राथमिक उपचार व मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर यांनी अर्जुनी मोरगाव वासियांना केले आहे.