महाबोधी विहार मुक्तीसाठी बुध्द पोर्णीमेपासुन धम्मगर्जना

0
20

सडक अर्जुनी,दि.१२ः बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बिहार येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजाच्या संपूर्ण ताब्यात यावे आणि बी. टी. अॅक्ट रद्द व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील बौद्ध विहार समित्यांनी ठराव संमत करावे.आणि जनजागृती करून आंदोलनास सुरुवात करावी, असे आवाहन आमदार इंजि. राजकुमार बडोले यांनी केले.

या बैठकीत त्यांनी “महाबोधी विहारावर आजही बौद्धांचे संपूर्ण अधिकार नाहीत. हे बौद्ध समाजाच्या अस्मितेचे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. B.T. Act ही ब्रिटिशकालीन व्यवस्था बौद्धांच्या अधिकारांवर अन्याय करते, ती त्वरित रद्द झाली पाहिजे.” असे सांगितले. बौद्ध पौर्णिमेनिमित्त विहारातून निघणाऱ्या रॅलीत, “बच्चा बच्चा भीम का – महाबोधी के काम का!” अशी घोषणा देऊन जनजागृती करण्यात यावी. या आंदोलनाचे रूप सायंकाळच्या धम्मसभांमध्ये भाषणांद्वारेही साकार करावे, असे ते म्हणाले.बैठकिला राजकुमार बडोले फाउंडेशनचे राकेश भास्कर, प्रशांत शहारे,अ‍ॅड. मयूर रामटेके, मिथुन टेंभुर्णे, माजी सभापती विश्वजीत डोंगरे,राजेश नंदागवळी,यावेळी जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी, पंचायत समिती सदस्या वर्षाताई शहारे, अर्जुनी मोरगाव नगर पंचायत नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका शारदाताई बडोले, लक्ष्मीकांत धानगाये, मीनाताई शहारे, दीपंकरजी उके, तथागत राऊत, डीलेश सोनटक्के, व मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते.