
आरोग्य विभागाने साजरा केला राष्ट्रीय डेंग्यु दिन
गोंदिया,दि.१७ः आरोग्य विभाग जिल्हा परिषदेच्या वतीने हिवताप विभाग, आरोग्य विभागाच्या एकत्रित सहकार्याने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय डेंग्यु दिन जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोशन राऊत,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण, वैद्यकिय अधिकारी डॉ. विकास विंचुरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी कार्यक्रम प्रसंगी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डेंग्यु आजाराबाबत विविध पोष्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती व जनजागृती करणे हा आहे. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एडिस इजिप्तटाय नावाच्या डासामुळे होतो. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये अंडी घालतात, त्यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते.कोणतेही साठवलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून न ठेवण्याबाबतची जनजागृती लोकांमध्ये आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका यांनी गावपातळीवर केल्यास नक्कीच डेंग्यु आजाराबाबतचे रुग्ण कमी होण्यास हातभार लागणार आहे.आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिंबधातमक उपचार करण्याविषयी ग्रामपंचायत स्तरावर जनप्रतिनिधी व लोकसहभागावर भर देण्याचे आवाहन ह्याप्रसंगी केले.डेंग्युचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले आहे.लोकसहभाग व ईतर विभाग,एनजीओ यांचा सहभाग घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी गावपातळीवर लोकांना आरोग्य शिक्षण देवुन त्यांच्या सवयी बदलण्याबाबत सामाजिक वर्तणुक बदलण्यावर विशेष लक्ष केंदीत करण्याच्या सुचना केल्यात.
जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी कीटकजन्य आजार नियंत्रणा करिता मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा,मच्छरदाणीचा वापर करावा,खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी,भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी,कुलर,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे.पाण्याचा हौद,टाक्या,रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे.नाल्या,गटारे वाहती करणे,साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, कुंडी व फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या,करवंटे,या मधील पाणी फेकणे,डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे अशा विविध उपाययोजना अंमलात आणुन किटकजन्य आजार लोकसहभागातुन कमी करण्याचे आवाहन या दिवसाबाबत केलेले आहे.यासाठी आतापासुनच शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षण देण्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर भालेराव, आभार प्रदर्शन आशीश बल्ले या6नी केले.यावेळी हिवताप विभागाचे किशोर भालेराव,अनिल चोरवाडे,वर्षा भावे,आशिश बले,आरोग्य पर्यवेक्षक ठाकरे,कमल डोंगरे,पंकज गजभिये यांचेसह जिल्ह्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहाय्यक,आरोग्य पर्यवेक्षक, तालुका किटक शास्त्रज्ञ तसेच आरोग्य विभाग व हिवताप विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.