
देवरी,दि.१७ः तालुक्यातील देवरी,चिचगड व ककोडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी अभियानाचा आढावा राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या आदेशानुसार देवरी तालुक्याचे पर्यवेक्षक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
यावळी प्रत्येक बुथनिहाय सभासद नोंदणी व सर्व समाज निहाय पुस्तके मध्ये बुथ प्रमुखाची भुमिका व सभासद प्रत्येक घटका पर्यंंत जावून जास्तीत जास्त नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.बुथ मजबूत तर पक्ष मजबूत, पक्ष संघटनेच्या माध्यमातून आपण पक्ष बांधनी करावी जेणेकरून आपल्याला ग्रामपंचायत, पंचायत समिती, सेवा सहकारी संस्थांची निवडणूक लढवण्याची असल्यास पक्षाला फायदा होईल व सर्व हेवेदावे बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीकरणासाठी बुथ प्रमुखाची भुमीका महत्वाची असेल असे जि.प.उपाध्यक्ष हर्षे यांनी आढावा बैठकित मार्गदर्शन करतांना सांगितले.
या सभेला तालुकाअध्यक्ष सि.के.बिसेन,जियालाल पंधरे,महिला तालुकाध्यक्ष पंकज शहारे नगर सेवक,गोपाल तिवारी, भैय्यालाल चांदेकर, सुजित अग्रवाल युवक अध्यक्ष,नेहमीचंद,दुरुगकर,मनोजसिह बैस, राजेश बिजलेकर, बबलूभाई पठाण, मकसुत शेख,बुल शेख, रोशन परिहार,अमरदास सोनबोईर, सचिन अग्रवाल,मनिस मोठे, गुरमीत सिंग भाटीया, द्वारका प्रसाद सोनबोईर, सागर बैस, गुंजन भाटीया,शत्रुघ्न झपारपार,चंद्रपूर शहारे, विजय भांडारकर, प्रमोद मेंढे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.