सायबर भामट्यांच्या बनावट नौकर भरती विरोधात महावितरणने केली तक्रार

0
82

गोंदिया 21/05/2025 : सायबर भामट्यांनी महावितरणची बनावट वेबसाईट बनवून नौकर भरतीची जाहिरात केल्याबद्दल महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केलेली असुन लोकांनी या बनावट जाहिरातीला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

फसवणूक करण्याच्या उद्देश्याने सायबर भामट्यांनी www.mahavitaranmaharashtra.com ही बनावट वेबसाईट तयार करून यात शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व सफाई कामगार या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले असुन या विरोधात महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली असुन सायबर भामट्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.