पोलिस भरतीत आरक्षणासाठी आंदोलनाचा दिला इशारा

0
17

गोंदिया,दि.२२. आगामी काळात जिल्हा पोलिस दलात 97 जागांकरिता भरती होणार आहे. मात्र भरती प्रक्रियेत ओबीसी प्रवर्गासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर वराडे यांच्या नेतृत्वात बुधवारी (दि.21) पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांची भेट घेऊन ओबीसी प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तुलनेत 19 जागा आरक्षित ठेण्यात याव्यात अन्यथा आंदोलन पुकारण्याचा इशारा देण्यात आला.
गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई पद भरती प्रस्तावित आहे. या पदभरती मध्ये 97 जागा प्रस्तावित केलेले आहेत. त्यापैकी ओबीसी प्रवर्गाला 19 जागा मिळायला हव्या. परंतु गोंदिया जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील 2020- 25 पोलिस शिपाई पदभरतीकरिता रिक्त असलेल्या पदांची ओबीसी प्रवर्गाकरीता एकही जागा दर्शविलेली नाही. मागील वर्षी सुद्धा पोलीस विभागाने 110 पदे भरली होती. यामध्ये ओबीसी विभागावर पूर्णता अन्याय करत त्यावेळी सुद्धा एकही जागा
दर्शविलेली नव्हती. हा जिल्ह्यातील ओबीसी उमेदवारांवर अन्याय आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 70 टक्के असलेला ओबीसी समाज निरंतर दोन वर्षेपर्यंत पोलिस पदभरतीमध्ये जर अन्याय ग्रस्त राहत असेल तर ही बाब जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करता अतिशय निंदा जनक आहे. त्यामुळे बुधवारी पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांना ओबीसी संघटनांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले. आदिवासी बाहुल असलेल्या नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातपोलिस भरतीमध्ये ओबीसींना वंचित ठेवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रामुख्याने प्रदेश काँग्रेस सचिव अमर वराडे यांच्यासह पोलिस भरतीतील युवक  विक्की लिल्हारे, श्रीराम भगत, राज भगत, मंगेश लांजेवार, हितेश गौतम, तरुण पटले, सपन लक्षणे, आयुष तुरकर, अजय बिसेन, दिनेश मेंढे, रोहित नागरीकर, विकास बाट, राहुल बुल्ले, तुषार लांजेवार, जयेश खटोले, नितीन चुटे, समीर कापसे, राकेश पाटील संकेत लांजेवार, अंकित बनकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.