लग्न आटपून नोकरीवर जाणाऱ्या शारदाचा अपघाती मृत्यू

0
89

तिरोडा-तालुक्यातील सरांडी जवळ काकाच्या मुलींचं लग्न आटोपून नोकरीवर परत येत असताना तिरोडा -तुमसर हायवेवर सरांडीजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक ड्रायव्हर ने अचानक ट्रकला ब्रेक मारल्यामुळे मागून स्कुटीने येत असलेल्या शारदा दामोदर फुंडेच्या स्कुटीला जोरदार धडक दिल्याने हिचा जागीच मृत्यू झाला.

नवेगाव धुसाडा ता.मोहाडी येथील शारदा फुंडे तिरोडा येथील धापेवाडा पाटबंधारे विभागात कालवा अधीक्षक म्हणून कार्यरत होती.ती काकाच्या मुलीच्या लग्न समारंभ कार्यक्रम आटोपून तिरोडा येथे परत येत असताना तालुक्यातील सरांडी जवळ सकाळी ९.३० वाजता दरम्यान 10 चक्का ट्रक क्रमांक MH-46 F0 121 अचानक ब्रेक मारल्याने मागून स्कुटी ट्रक वर जोरात आदळली. त्यात शारदा दामोदर पुंडे ही जागीच कोसळून मृत पावली. स्कुटी क्रमांक MH-49B G 7645 या आपल्या वाहनाने निघाली होती. हिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.शारदा दामोदर पुंडे हिला दोन भाऊ तीन बहिणी व आई-वडील असा परिवार असून मोठा भाऊ विजय चंद्रपूर येथे पोलीस विभागात पीएसआय पदावर कार्यरत आहे.दुसरा भाऊ सोमप्रकाश हा कश्मीरमध्ये सेनादलात आहे.शारदाने एमपीएससीची परीक्षा पास केलेली होती ती नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत होती.सकाळी तिरोडा जोडील सरांडी येथे साडेनऊच्या सुमारा शारदा च्या अपघात झाल्याचे कळताच शारदाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर शेंडे यांनी शारदा स्मृत घोषित केले.अपघातामुळे नवेगाव येथील पुंडे परिवार व समस्त त्यांच्या कौटुंबिकांवर भागात झाल्याचे असून गावात पूर्णतः हळहळ व्यक्त केली जात आहे.