
गोंदिया-राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया अंतर्गत 01 मे ते 15 जून तंबाखू नकार दिनानिमित्य 45 दिवसाच्या अभियाना अंतर्गत नगरपरिषद गोंदिया येथे मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण कार्यशाळा संपन्न झाली.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली.सदर कार्यशाळेला बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पवन राऊत यांनी उपस्थितांना सीपीआर तर मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण बाबतचे प्रशिक्षण जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे यांनी दिले. डॉ.अनिल आटे यांनी उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोटपा कायदा 2003 अंतर्गत येणाऱ्या कलमांची माहिती देऊन पोष्टर मार्फत जनजागृती केली.यावेळी जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड , दंत शल्यचिकित्सक डॉ. अमोल राठोड,सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर,मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम व दंत सहाय्यक विवेकानंद कोरे उपस्थित होते.