व्यापारी प्रविण खवासचा ट्रकच्या धडकेत मृ्त्यू

0
150

तुमसर,दि.२३ः तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तुमसर बावनथडी महामार्गावरील टुमनी नाल्याजवळ २२ मे च्या सायं. 6.30 वाजे दरम्यान ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.मृत दुचाकीचालकाचे नाव प्रविण बबलु खवास रा.परसवाडा ता.तुमसर असे असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य खरेदी -विक्रीचे काम करतात.व्यापारी प्रविण खवास हे आपल्या दुचाकी क्र. MH-36/E 3769 तुमसर वरुन गावाकडे जात असताना टुमनी नाल्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आल्याने प्रविणचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळवरुन पसार झाला. पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.