आंगोळीकरीता गेलेल्या दोन तरुणांचा बाघनदीत बुडून मृत्यू

0
254
गोंदिया,दि.२५ः जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कालीमाटीजवळील बाघनदी येथे पहाटेच्या सुमारास आंघोळीकरीता गेलेल्या दोन युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (दि.२५)रविवारला सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.विशेष म्हणजे हो दोन्ही तरुण पोलीस भरतीची तयारी करीत होते.कृष्णकुमार हेतराम पारधी (19) आणि शुभम भीमराव कांबळे (20)दोघेही राहणार काळीमाटी,ता.आमगाव असे घटनेतील मृत तरुणांचे नाव आहेत. यातील एका तरुणाने तर पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. खाकीचं स्वप्नं काही पावलं दूर होतं, तोपर्यंतचं काळाने त्याच्यावर झडप मारली.दोन मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
दोघेही मागील काही काळापासून पोलीस भरतीची तयारी करत होते. त्यासाठी ते दररोज सकाळी लवकर उठून सरावासाठी जात होते. पण रविवारी सकाळी दोघांचा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील पोकेटोला मानेकसा येथील आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी शुभम आणि कृष्णकुमार या दोघांनी लवकर उठून धावण्याच्या सराव केला. यानंतर दोघंही नदीच्या पाण्यात अंघोळीसाठी गेले होते. दरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. शोध पथकाला ही दोन्ही मृतदेह गवसली असून उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत.