अवैध गांजासोबत 20 लाख रुपयांच्या नोटा जप्त

0
304

गोंदिया : रावणवाडी ठाणा अंतर्गत कामठा येथे फरार आरोपी उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल च्या घरझडती कारवाईत स्कूल बॅगमध्ये अवैधरित्या घरी साठवून विक्रीकरिता ठेवलेला एकुण 600 ग्रॅम गांजा किंमती 12000 रु. व 500 च्या 4000 नोटा (वीस लक्ष रुपये) असा एकुण किंमती 20 लक्ष 12 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक गोंदिया  गोरख भामरे , अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री, वापर, साठा व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धाड कारवाई करण्यासाठी प्रभावी धाड मोहीम राबविण्यात यावी असे निर्देश सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिले आहेत. या अनुषंगाने संपुर्ण जिल्हास्तरावर एन.डी. पी.एस. (NDPS) कायद्यान्वये कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून दिनांक- 25/05/2025 रोजी वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थाची तस्करी, साठा, वापर, विक्री व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मोहीम छेडत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीच्या आधारे मौजा- कामठा ठिकाणी अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध धाड कारवाई केली असता फरार आरोपी नामे उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल वय 25 वर्षे राहणार कामठा हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. खात्रीशीर माहितीच्या आधारे वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे त्याची आई ललिता अग्रवाल यांच्या समक्ष, प्रतिष्ठित पंचासह त्याचे राहते घराची घरझडती घेवून पाहणी केली असता त्याचे राहते घराचे घरझडतीत लोखंडी आलमारीत एका निळ्या रंगाच्या स्कूल बॅग मध्ये विक्री करिता साठवून ठेवलेला 600 ग्रॅम ओलसर, पाने, फुले, फळे, बिया मिश्रित गांजा किंमती 12000/- रुपये तसेच गांजाच्याच बॅग मध्ये गांजा विक्रीच्या पैश्यातून साठवून ठेवलेली रक्कम 500 रुपये दराच्या एकुण 4000 नोटा असा एकुण किंमती 20,12,500/- (वीस लाख बारा हजार पाचशे) रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या साठवून ठेवलेल्या स्थितीत मिळून आल्याने सदर संबंधात आरोपीची आई ललिता अग्रवाल यांना विचारपूस चौकशी केली असता मिळून आलेल्या अंमली पदार्थ गांजा व रकमेबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून मुलगाच सांगू शकतो असे सांगितल्याने अवैधरित्या गांजा व रक्कम साठवणूक केल्याची खात्री झाल्याने जप्तीची रीतसर कायदेशीर कारवाई प्रक्रिया करून मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
फरार आरोपी उमेश उर्फ करण हरिचंद अग्रवाल वय 25 वर्षे रा. कामठा यांचे विरुद्ध पोलीस ठाणे रावणवाडी येथे पो.उप.नि. शरद सैदाणे यांचे तक्रारी वरून एन. डी.पी. एस. कायद्याचे कलम 8 (क), 20 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस ठाणे रावनवाडी पोलीस करीत आहेत. यात उल्लेखनीय बाब अशी की, यातील फरार आरोपी- उमेश याचा भाऊ नामे – घनश्याम अग्रवाल, मयत वडील- हरिचंद अग्रवाल, आणि ईतर साथीदार 1 याचे ताब्यातून सन 2021 मध्ये 71 किलो गांजा किंमती 8 लक्ष 43 हजार रुपयांचा जप्त करण्यात आले होते. त्याचे विरुद्ध पो. ठाणे रावणवाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर परिवार हा गांजा चे विक्री व्यवसायात बऱ्याच काळापासून गुंतला आहे किंवा कसे याबाबत वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस प्रशासनातर्फे पुढील सखोल तपास करण्यात येत आहे. सदरची दर्जेदार धाड कारवाई पोलीस अधीक्षक  गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक. नित्यानंद झा, यांचे दिशा निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मपोउपनि वनिता सायकर, पोउपनि. शरद सैदाने, अंमलदार राजू मिश्रा, महेश मेहर, दुर्गेश तिवारी, सुजित हलमारे, सोमेंद्र तूरकर संतोष केदार, कुमुद येरणे, घनश्याम कुंभलवार यांनी कारवाई केलेली आहे.