38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home क्रीडा आदर्श दमाहे यांना राज्यस्तरावर बाधा दौड मध्ये सुवर्ण पदक

आदर्श दमाहे यांना राज्यस्तरावर बाधा दौड मध्ये सुवर्ण पदक

0
47

blank

चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील आदर्श दमाहे यांना राज्यस्तरावर बाधा दौड मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की नागपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत संत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर येथे स्पर्धा पार पडल्या, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा समावेश होता. या स्पर्धेत आदर्श दमाहे यांनी 400 मीटर बाधा दौड (अडथळा) शर्यतीत सुवर्ण पदक पटकावून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

आदर्श दमाहे यांनी आपल्या यशाचे श्रेय वडील कमलेश रमेशजी दमाहे, आई अर्चना कमलेश दमाहे आणि कोच निहाल इलमे यांना दिले आहे.२२ जून २०२५ ते २४ जून २०२५ या कालावधीत होणार्या उत्तरप्रदेशमधील राष्ट्रीय स्पर्धेत आदर्श दमाहे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांच्या यशाबद्दल संतोष बंधाटे, बाल्या मेश्राम, सतीश बंधाटे, संतोष बोहने, भागेश्वर काका, शैलेश दमाहे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .

blank