30.5 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ पायल चौधरीची फॉरेन्सिक विभागाच्या सहायक वैज्ञानिक पदी निवड

पायल चौधरीची फॉरेन्सिक विभागाच्या सहायक वैज्ञानिक पदी निवड

0
6445

blank

गोंदिया – स्थानीय शास्त्री वॉर्ड येथील रहिवाशी असलेले मुख्याध्यापक त्रिलोक चौधरी ( मुळगाव -मुरपार/राम. ता.-सडक अर्जुनी) यांची मुलगी पायल त्रिलोक चौधरी हीची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून फॉरेन्सिक विभागाच्या सहाय्यक वैज्ञानिकपदी निवड झाली आहे.
पायल ही सध्या गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे मागिल अडीच वर्षांपासून डाक विभागात पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत होती. विशेष म्हणजे वडील ही त्याच गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. सदर पदाला प्रामाणिकपणे न्याय देऊन डाक विभागाचे कार्य अत्यंत चोखपणे बजावत असताना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पायलने या पदाला गवसणी घातली.
पायलचे शिक्षण एम.एससी. व संगीत विशारद पर्यंत झालेले आहे. नोकरी करत असतांनी निरंतर अभ्यास करून कुठेही कोचिंग न लावता जीज्ञासापूर्वक स्वयंप्रेरणेने स्पर्धा परीक्षा देत डी.एफ.एस.एल. गृह विभाग अंतर्गत स्पर्धा परीक्षेत यशाचे शिखर गाठून आज सहायक वैज्ञानिक (Scientific Assistant) या पदावर निवड झाल्याने सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे. तिच्या या यशाबद्दल शास्त्री वॉर्ड पोवार समाज संघटनासह सटवा येथील सरपंच अर्चना ताई ठाकुर, उपसरपंच विनोद पारधी,भागचंद्र रहांगडाले, पोलिस पाटील टिकाराम रहांगडाले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रविंद्र कटरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र रहांगडाले, सेवा सहकारी अध्यक्ष डॉ. के.टी.कटरे,महेंद्र ठाकूर,पुरणलाल ठाकूर यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिकांनी पायल चौधरीचे अभिनंदन केले आहे.

blank