38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home मराठवाडा/खान्देश मसाप परभणी शाखेच्या अध्यक्षपदी बा.बा.कोटंबे तर कार्यवाहपदी प्रा.भगवान काळे यांची निवड

मसाप परभणी शाखेच्या अध्यक्षपदी बा.बा.कोटंबे तर कार्यवाहपदी प्रा.भगवान काळे यांची निवड

0
29

blank

परभणी ता.29-मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक बा. बा. कोटंबे तर प्रमुख कार्यवाहपदी प्रा. भगवान काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी निवडीच्या बैठकीसाठी मंगळवारी मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे, डॉ. आसाराम लोमटे, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, सरोज देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व सभासद उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनुमते बिनविरोध कार्यकारीणी निवडण्यात आली.
अध्यक्षपदी बा. बा. कोटंबे, उपाध्यक्ष मोहन कुलकर्णी, राजेंद्र गहाळ , प्रमुख कार्यवाह भगवान काळे, कोषाध्यक्ष माणिक पुरी, कार्यकारीणी सदस्य- गो. द. पहिनकर, सावित्री चिताडे, अरविंद सगर, गंगाधर गायकवाड , बबन आव्हाड, त्र्यंबक वडसकर यांची निवड करण्यात आली.नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा मसापच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

blank