33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home महाराष्ट्र शशांक हगवणेचा मामा IPS जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा मोठा दणका!

शशांक हगवणेचा मामा IPS जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा मोठा दणका!

0
118

blank

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तपास जसजसा गती घेत आहे, तसतसे वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची वेळ येत आहे. आता गृह विभागाने मोठा निर्णय घेत करत आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे यांचे मामा असल्याने, या प्रकरणात त्यांच्यावरही सातत्याने आरोप होत होते.गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन महत्त्वाच्या विभागांचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. त्यांची बदली आता पुणे विभागात करण्यात आली आहे. ही नियमीत बदली असल्याचे सांगण्यात येत असले तरी, वैष्णवी प्रकरणामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जालिंदर सुपेकरांवर कारवाईची मागणी करत आरोप केला होता की, हगवणे कुटुंबाला त्यांनी पाठीशी घातलं, आणि सून वैष्णवीवर होणाऱ्या छळाकडे दुर्लक्ष केलं. याच पार्श्वभूमीवर ही हालचाल झाल्याचं बोललं जात आहे.दरम्यान, हगवणे कुटुंबातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. शशांक हगवणे, त्याची सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांची पोलिस कोठडी 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

blank