
||कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेशु कदाचनः||
फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे कष्ट करत राहा.हा संदेश आपल्या कार्यातून पोहोचविणारे
तासगाव पंचायत समिती,चे शिक्षण विस्तार अधिकारी आर.यु.राठोड साहेब हे प्रदीर्घ सेवेनंतर शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांचे मूळ गाव लमाणतांडा,दरिबडची हे आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणतांडा येथे झाले. माध्यमिक शिक्षण श्री.भैरवनाथ हायस्कूल दरीबडची येथे झाले.तर जागृती अध्यापिका विद्यालय तासगाव येथे डी.एड झाले.
त्यांचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण सन १९८४ -८५ साली झाले. पंचायत समिती, तासगाव येथे शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर २० जुलै २०२३ ते ३१ मे २०२५ अखेर उत्कृष्ट असे काम केले आहे.आपली कर्मभूमी असलेल्या दुष्काळी जत तालुक्यात १८मार्च १९८९ ला ते प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले होते.मोटेवाडी को.बो,पांढरेवाडी, जालिहाळ खुर्द,पुन्हा पांढरेवाडी ता जत येथे कार्यरत होते व नंतर शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पंचायत समिती तासगाव येथून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी, प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून आसंगी तुर्क केंद्राचे काम पाहिले आहे त्यांनी केंद्रातील सर्व शाळांना भेटी देऊन शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन केले.शिक्षकांना वेळेचे महत्व समजून सांगितले. कामाबद्दल आस्था निर्माण केली.प्रशासनावर वचक ठेवला.केंद्रातील अनेक शिक्षकांची प्रशिक्षणे यशस्वी केली. त्यांच्या सहकार्याने जत तालुक्यातील पहिली द्विशिक्षिकी शाळा आय.एस.ओ मानांकन मिळवण्याचं श्रेय आसंगी तुर्क केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबरवस्ती (पांडोझरी) शाळेस मिळाले,चाळीस कुटुंब व्यसनमुक्त केली, बाबरवस्ती पांडोझरी परिसरात सार्वजनिक ठिकाणी १०५१ वृक्षारोपण करण्यात आले. या कामासाठी मार्गदर्शक म्हणून खूप मोठी भूमिका बजावली.वृक्षारोपण व वृक्ष संगोपन,शिष्यवृत्ती,एन .टी .एस,एन.एम.एम.एस, तसेच नियमित परीक्षा व डॉ. पंतगराव कदम गुणवत्ता शिष्वृत्ती परीक्षा यशस्वी पार पडल्या.
शाळाबाह्य, दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणले.मुलींच्या शिक्षणासाठी विविध उपक्रमाची अंमलबजावणी केली.विद्यार्थ्यांसाठी गणवेश, पाठ्यपुस्तके, शिष्यवृत्ती व विविध क्रीडा स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे नियोजनपूर्वक अंमलबजावणी केली आहे. केंद्रातील सर्व शाळा शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अतिशय प्रयत्न केले.
फाउंडेशन व शिक्षक संघटना व सेवाभावी संस्थेचे वतीने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.तसेच पंचायत समिती जत तर्फे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २००३ देण्यात आला,तर सांगली जिल्हा परिषदेने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २००४ रोजी देऊन सन्मान केला.
राठोड साहेबांचे कार्यालयातील कामे :
केंद्रातील शिक्षकांची व शाळेची अद्यायवतीकरण, शाळेला भेटी देऊन गुणवत्ता विकास, लोक वर्गणी,अभिलेखे अपडेट करणे, बाबींची नियोजनपूर्वक वेळेत पूर्तता व कार्यवाही केली आहे. पारदर्शी,आदर्शवत काम करुन एक आदर्श घालून दिला आहे.
प्राथमिक शिक्षक, वरिष्ठ मुख्याध्यापक,प्रभारी केंद्र प्रमुख , शिक्षण विस्तारअधिकारी म्हणून साहेबांनी शिक्षकांच्या अडीअडचणी प्रामाणिकपणे सोडविल्या.प्रत्येक शिक्षकांना ते आनंदी रहा.टेंशन घेऊ नका.असा सल्ला देत.आम्हा शिक्षकांची आस्थेने चौकशी करणारे अधिकारी होते. परंतु त्यांनी आपल्या वर्तनातून कधीच अधिकारीपणा दाखविला नाही.त्यांंचा आमच्यावर आपुलकीचा दरारा होता.
एक अभ्यासू, शिक्षणावर जीवापाड प्रेम करणारे अधिकारी म्हणून ते सर्वांना परीचित आहेत. त्यांचे कुटुंब सुखी समाधानी आहे.त्यांना एक मुलगी आहे. शिक्षण चालू आहेत.त्यांचा स्वभाव नेहमी इतरांना सहकार्य करण्याचा आहे.
सेवानिवृत्ती नंतरही ‘शैक्षणिक व सामाजिक कार्य’ साहेब सुरूच ठेवतील. त्यांचे पुढील जीवन सुखी समाधानी जावे.त्यांना दीर्घ आयुष लाभो.
साहेब,आपणास सेवानिवृत्ती निमीत्त लाख.. लाख.. शुभेच्छा!
दिलीप वाघमारे,
प्राथमिक शिक्षक,नांदेड