36.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ शॉर्ट सर्किटमुळे खरबी येथे लागली घराला आग

शॉर्ट सर्किटमुळे खरबी येथे लागली घराला आग

0
28

तुमसर  : तालुक्यातील खरबी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतीपयोगी सामान जळून खाक झाला. उल्हास कुंडलिक बडवाईक रा. खरबी यांच्या घरी दि.३१ मे २०२५ रोजी सकाळी नऊ वाजतादरम्यान अचानक घरातील समोरील भागात धूर निघतांना दिसला. बघितले असता पाल, तिरूपाल व बारदाना व अनेक सामान जळत होते. घरकूल योजनेतून नवीनच घर तयार झाले होते.

या आगीमुळे घराच्या भिंतीलाही तळे गेलेले आहेत. शेजार्‍यांच्या मदतीने आग विझविण्यात आले. मोठी हानी टळली. आगीचे कारण बघितले असता वरील विद्युत बोर्डात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ठिगणी उडाली व खाली ठेवलेला सामान जळून खाक झाला, असे लक्षात आले. आगीत ५० हजारांचे नुकसान झाले असून शासनाने या शेतकर्‍याला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खरबी येथील सरपंच रत्नमाला राहुल बडवाईक यांनी केली आहे.