
गोंदिया, दि.8- जिल्ह्यातील सालेकसा तालुका किटकजन्य आजाराकरीता अतिसंवेदनशिल आहे.मागील तीन वर्षाची आकडेवारी बघता सालेकसा तालुक्यात सर्वाधिक 62 गावे हे जोखीम ग्रस्त असल्याने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांच्या दुरदृष्टी नजरेतुन 62 गावावर पावसाळ्यापुर्वीच प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग मिशन मोडवर काम सुरु केले आहे.मागील वर्षाचा अनुभव बघता सालेकसा तालुक्यातील एकट्या प्राथमिक आरोग्य केंद दरेकसा अंतर्गत 44 गावांवर आरोग्य विभागा वर लक्ष केंद्रीत केले आहे.पावसाळ्यापुर्वीच प्रतिबंधासाठी सर्व गावांवर आरोग्य विभागाचे पथक मिशन मोडवर काम सुरु केले असुन सर्व गावात कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु केले असल्याची माहीती डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
4 जुन रोजी आरोग्य विभागाचे पथकाने दिवशी एकाच वेळेस 20 आशा सेविका,4 आरोग्य सेविका,5 आरोग्य सेवक व 3 आरोग्य सहायक, दोन कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ यांच्या पथकामार्फत मुरकुटडोह क्रमांक 1,2,3, दंडारी व टेकाटोला ह्या गावात डेरा टाकुन घरोघरी भेट देवुन गृहभेट दरम्यान कंटेनर सर्वेक्षण केले.गावातील विटाभट्टी,रोजगार हमी कामे येथे भेट देवुन संशयीत ताप रुग्णांचे रक्त नमूने, स्थलांतरीत होवून परत आलेल्या रुग्णांचे व गावातील संशयीत ताप रुग्णांचे रक्त नमूने,नियमित किटकशास्त्रीय सर्वेक्षण, तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये डी-लार्वा टाकणे, कोरडा दिवस पाळणे, किटकजन्य आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करणे व ग्रामपंचायत भेटी करुन मिशन मोडवर कार्यवाही केली त्यात 846 लोकांचे जलद ताप सर्वेक्षण आर.डी.के.किट ने रक्त तपासणी केली,साचलेल्या पाण्यात डीलार्वा मार्फत डास अळी नियत्रंण कार्यवाही करण्यात आली.
सालेकसा तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस गिरी, डॉ.प्रभाकर डोंगरवार यांच्या विशेष मार्गदर्शनात व हिवताप विभागाचे जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक नंदकिशोर भालेराव यांच्या नेतृत्वात ठाकूर, खापर्डे,गणवीर,दिपेश चौहान,देखमुख, दिपेवड, जायभाये,मसराम, व आरोग्य सेविका हेमलता फुंडे,सय्याम सोबत एम्बेड केंद्रसाशित एनजिओचे हिमानी यादव, यांनी प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्ण केली तर सालेकसा व आमगाव तालुक्यातील दोन कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ नागपुरे व बिसेन यांच्या द्वारा डास संशोधन व जनजागरण करण्यात आले.