41.9 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ तिरोड्यात ३२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

तिरोड्यात ३२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
4

blank

जागतिक रक्तदान दिन : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रूग्णालयाचा उपक्रम
तिरोडा, ता. १६ : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रूग्णालय तिरोडा येथे सोमवारी (ता.१५) घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३२ व्यक्तींनी रक्तदान केले.‌ जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.‌ नागपूर येथील हेडगेवार रक्तपेढीतील चमूने रक्त संकलनाचे कार्य केले.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी सेवा रूग्णालय तिरोडा यांच्या वतीने विमा रूग्णांच्या सेवेसाठी विविध आरोग्यविषयक शिबीर आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. विमा वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णकांत चाटे, विमा वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनात तथा अधिपरीचारिका भाग्यश्री क्षिरसागर, कृपाली नंदेश्वर, सुशांत वासनिक यांच्या उपस्थितीत तज्ञांनी आवश्यक नियम व सुरक्षिततेची काळजी घेऊन रक्त संकलनाचे कार्य केले. रक्तदान शिबिरात 61 लोकांनी हजेरी लावली. सर्वांची रक्ताची तपासणी करून बीपी, शुगर, सिकल सेल आणि अन्य आजाराची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३२ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. रक्तदान हे मानवतेची सेवा करणारे एक श्रेष्ठ कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. दरम्यान रक्तदात्यांना प्रमाणपत्र, डोनर कार्ड व भेटवस्तू प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. सिकलसेल, थॅलेसिमीया सारख्या रूग्णांना नियमीत रक्ताची गरज पडते. शिवाय प्रसूती, दीर्घ आजारी रुग्ण तथा अपघातग्रस्तांना सूध्दा रक्ताची गरज असते. रक्तदान केल्यामुळे कुणाचे तरी प्राण वाचवले जातात. त्यामुळे नागरीकांनी रक्तदान शिबीरात हीरहीरीने सहभाग घेवून रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अधिपरिचारीका भाग्यश्री केळवतकर यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.