32.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home गुन्हेवार्ता मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात इसमाला मारहाण

मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याची भर चौकात इसमाला मारहाण

0
569

गोंदिया- जिल्ह्यात चक्क पोलीस कर्मचाऱ्याने छत्तीसगढ राज्यातील एका इसमाला बेदम मारहाण  केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला कांचन राहुले हा पोलीस कर्मचारी रस्त्याने जात असताना छत्तीसगड राज्यातील सुनीतकुमार मडावी याने कट मारून ओव्हरटेक केल्याच्या आरोप केला.

दरम्यान, याच कारणावरून पोलीस कर्मचारी कांचन राहुले याने  सुनीतकुमार मडावीला जबर  मारहाण केली. ही घटना 19 मे 2025 रोजी घडली. त्यानंतर सुनीतकुमार मडावी याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावर पोलिसांनी संबंधित पोलिसावर कारवाईचा बडगा उगारत निलंबित केलं असून सदर पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती देखील पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.

तर दुसरीकडे,  पोलीस कर्मचाऱ्याने मला चुकीच्या पद्धतीने मारहाण केली आणि आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलीन झाल्याचा आरोप करीत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीतून बडतर्फ करावं, अशी मागणी सुनीतकुमार मडावी याने पोलीस विभागाकडे केली आहे.