चंद्रपूर शहरातील जड वाहनांची समस्या निकाली काढा-आपचे निवेदन

0
10
चंद्रपूर,दि.०८ः आम आदमी पार्टी चंद्रपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देत शहरात दिवसेंदिवस वाढणारी जड वाहनांची वाहतूक, त्यातून होणारे अपघात, वाढलेली ट्रॅफिकची समस्या आणि नागरिकांच्या जीविताला होणारा धोका या पार्श्वभूमीवर समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या आधीआमदार किशोर जोरगेवार यांना भेटून चंद्रपूर शहरातील जड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची माहिती दिली होती. आणि त्यावर उपाय म्हणून रिंग रोड व जड वाहनांवर वेळेची मर्यादा घालावी असे स्पष्टपणे सुचवले होते. पण त्यांनी यावर कोणतीही कृती केली नाही.””इतकेच नव्हे तर आम आदमी पार्टी चंद्रपूरने याच विषयावर राज्यपालांसोबत देखील अधिकृतपणे चर्चा केली होती आणि शहरासाठी रिंग रोड गरजेचा आहे, हे मांडले होते. पण दुर्दैवाने त्या पातळीवरही याकडे कुठलेही लक्ष देण्यात आले नाही.”अशी खंत अध्यक्ष योगेश गोखरे यांनी व्यक्त केली.
जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरेल आणि आंदोलन करेल अशा इशारा निवेदनातून दिला आहे.निवेदन देतांना योगेश गोखरे चंद्रपूर महानगर अध्यक्ष,मयूर राईकवार चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष,राजू कुडे चंद्रपूर युवा जिल्हा अध्यक्ष,तब्बसूम शेख चंद्रपूर महानगर महिला अध्यक्ष,संतोष बोपचे चंद्रपूर महानगर संघटन मंत्री,प्रशांत शिदूरकर चंद्रपूर जिल्हा सचिव,एकनाथ हांडेकर चंद्रपूर शिक्षक आघाडी महानगर अध्यक्ष व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.